पुणे -प्रतिनिधी
कुस्तीकुस्तिका (Wrestling ) महादंगल २०२६: चार राज्यांचे पैलवान प्रजासत्ताकदिनी आमनेसामनेकुस्तीप्रेमींसाठी मुंबईत इतिहास घडणार! पहिल्यांदाच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या कुस्तीची चार बलाढ्य राज्यांचे अव्वल पैलवान एकाच मैदानावर थरारक लढतीसाठी तयार. ‘कुस्ती महादंगल २०२६’ ही एकदिवसीय भव्य स्पर्धा २६ जानेवारीला दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विलासराव देशमुख मैदान, लोखंडवाला, कांदिवली (पूर्व) येथे होणार आहे.नरसिंह यादवांच्या संकल्पनेतून चार संघांचा महासंग्रामअर्जुन पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि मुंबई पोलीस उपायुक्त नरसिंह यादव यांच्या नरसिंह फाउंडेशन व नागरिक संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा प्रजासत्ताकदिनाला साजेसी. प्रत्येक राज्यातून ५ पुरुष व २ महिला पैलवान – एकूण २८ कुस्तीपटू कसब पणाला लावतील. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर.चार संघांची यादी:मराठा वॉरियर्स (महाराष्ट्र):
पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी, वर्ल्ड मेडलिस्ट), रविराज चव्हाण, आदर्श पाटील, सोनबा गोंगाणे, अक्षय ढेरे.
महिला: अमृता पुजारी, सोनाली महाडिक.शेर-ए-पंजाब (पंजाब):
करणदीप (पंजाब केसरी), संदीप मान, रोहित प्रजापत, उदय शर्मा, अभिषेक यादव.
महिला: प्रियंका सिकरवार, शिवानी.हरियाणा शूर (हरियाणा):
अंकुश, अमित, निवान, आकाश, सागर.
महिला: कुसुम दहिया, मोनी गुर्जर.यूपी योद्धा (उत्तर प्रदेश):
अभिनायक सिंह (यूपी केसरी), मुलायम यादव, तेजवीर यादव, आयुष चौधरी, विशाल सहानी.
महिला: प्रियंका सिकरवार, फ्रीडम यादव.मान्यवरांची उपस्थिती व दिग्गजांचा सन्मानकेंद्रीय मंत्री पियुष गोयल, गिरीश महाजन, रामदास आठवले, आमदार अतुल भातखळकर, आशिष शेलार व संजय उपाध्याय प्रमुख पाहुणे. हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व जागतिक कुस्तीपटूंचा विशेष सन्मान होईल.’कुस्तीला व्यावसायिक व्यासपीठ’ – नरसिंह यादवनरसिंह यादव म्हणाले, “मुंबईत कुस्तीला व्यापक व्यासपीठ मिळावे म्हणून लीगसारखी ही स्पर्धा. येथून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील. भविष्यात सर्व राज्यांचा सहभाग असेल.” हे महादंगल कुस्तीला नवे वळण देणार!
