दुहेरी हत्याकांड ; खून का बदला खून ? कुरकुंभजवळ दुहेरी हत्याकांड आरोपीची कोयत्याने निर्घृण हत्या; पाटस परिसरात भीती व तणाव

पुणे – प्रतिनिधी

दुहेरी हत्याकांडाची (Double Murder )  सावली पुन्हा गडद झाली आहे. २०२१ च्या रक्तरंजित घटनेतील आरोपी महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस) याची शुक्रवारी रात्री पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ पिकअप धडक व कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. या थरारक घटनेमुळे पाटस व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भागवत आपल्या साथीदारांसह दुचाकीवर पाटसकडे परतत असताना मुकदमवाडी उड्डाणपुलाजवळ पाठीमागून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. धडकेत खाली कोसळताच हल्लेखोरांनी कोयता व सत्तूरसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
या प्रकरणी महेश मारुती टुले (Mahesh TUle )यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी आनंद माकर, विकी शितकल, संतोष शितकल (रा. आंबिकानगर, पाटस) व दोन अज्ञातांविरुद्ध खून व जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.दरम्यान, ४ जुलै २०२१ रोजी पाटस तामखड्यात शिवम शितकल व गणेश माकर या दोन तरुणांची निर्घृण हत्या (Murder News )झाली होती. त्या दुहेरी हत्याकांडात मन्या भागवतसह इतरांवर यवत पोलिसांत (Yavat Police Crime ) गुन्हा दाखल झाला असून, तो जामिनावर बाहेर होता. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या प्रकरणातील तिघांना लक्ष्य करण्यात आले असून, भागवतचा मृत्यू झाला तर उर्वरित दोन जखमी झाल्याचे समजते. या हल्ल्यामागे २०२१ च्या दुहेरी हत्येचा सूड असल्याचा संशय आहे.
दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार (Daund Pi Gopal Pawar)यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत. घटनेनंतर पाटस परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *