पुणे – प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाने वाढवलेल्या कारवाईत मांजरी (Pune crime)परिसरात पेट्रोलिंगदरम्यान दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात मांजरी पोलिसांना यश आले आहे .(manjari police station)
मिळालेल्या माहितीनुसार मांजरी पोलीस स्टेशनच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमल्दार प्रशांत दुधाळ यांना गोपनीय बातमी मिळाली की आधारावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट गेटजवळ दोन संशयित गावठी पिस्तूलसह येणार आहेत.पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानेसापळा रचला होता. संशयित बालकांनी पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न केला .पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अंगझडती घेतली असता एका बालकाकडून गावठी पिस्तूल मिळून आले, असा ५०,००० मुद्देमाल जप्त करण्यात आला .(manjari police station)
सदरील कामगिरी . राजकुमार शिंदे, पोलीसउप आयुक्त साो., परिमंडळ ६ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे, बाबासाहेब निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांजरी पोलीस स्टेशन(pi babasaheb nikam), पुणे शहर, यांचे सुचनां प्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश कवळे (psi mahesh kawale), अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे .
