Wagholi Crime : भांडी’ मागितल्याने 58 वर्षीय व्यक्तीची क्रूर खून ! वाघोलीत ती धक्कादायक घटना

पुणे -प्रतिनिधी

 

पुण्याच्या वाघोलीतील (Wagholi police Station )आव्हाळवाडी भागात माणुसकीचा शेवटचा धागा तुटल्याचे विदारक दृश्य घडले. भाडेकरू भास्कर मोहन राठोड (58)  (Bhaskare Rathod) यांच्या घरगुती भांडी व सामानाच्या देवाणघेवाणीवरून शेजारील तरुण दाम्पत्याशी वाद झाला आणि त्यात अमानुष मारहाणीत राठोड यांना जीव गमवावा लागला. (Death )मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतूरचे राठोड हे वाघोलीत (Wagholi) भाड्याने राहत होते.

 

शेजारीच राहणारे आनंद वर्मा (26) आणि शीला वर्मा (24) हे दाम्पत्य त्यांच्याकडे ठेवलेल्या भांड्यांवरून 16 फेब्रुवारी रोजी वादावादीत उतरले. (Wagholi )किरकोळ मागणीवरून भडकलेल्या दाम्पत्याने ज्येष्ठ राठोड यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी (Wagholi POlice Station)आनंद व शीला वर्मा दाम्पत्याला अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *