पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्या, आयटी-औद्योगिक विस्तार आणि हवाई प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अधिकृत मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमीन अधिग्रहण १ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.विमानतळाचे महत्त्व: सध्याच्या पुणे विमानतळावर प्रवासी-मालवाहतुकीचा प्रचंड ताण आहे.
पुरंदर विमानतळाने (Purandar Airport ) पुणे, सातारा, सोलापूर(solapur), अहमदनगर (ahmednagar) आणि कोल्हापूरला थेट आंतरराष्ट्रीय हवाई जोड मिळेल. मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियाशी कनेक्टिव्हिटी वाढेल.केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “एअर कनेक्टिव्हिटी गुंतवणूक-उद्योगवाढीसाठी महत्त्वाची. नवी मुंबईनंतर पुरंदर हा पश्चिम महाराष्ट्राचा दुसरा मोठा विमानतळ ठरेल.”आर्थिक फायदे:लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, एमएसएमई उद्योगांना चालना.फळे, भाजीपाला, कृषी निर्यातीसाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ.हजारो थेट-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती.परकीय गुंतवणूक, पर्यटन वाढ.या प्रकल्पाने पश्चिम महाराष्ट्राच्या दीर्घकालीन विकासाला गती मिळेल. राज्य-केंद्र सरकारच्या समन्वयातून नियोजित वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.(Purandar Airport )
