पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील चिखलगाव रावडी हद्दीत धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०-३५ वर्षीय महिलेचा मृतदेह वाहत जात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. तात्काळ पोलिस सूचना दिल्यावर भोर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह (Death body)बाहेर काढण्यात आला. ओळख पटल्यानंतर ती राधिका सुरेश सावंत (करंदी, धोंडेवाडी) असल्याचे स्पष्ट झाले .
आत्महत्या की घातपात?
मृत्यूचे नेमके कारण अज्ञात. शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे. कालव्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपटले असून, बंधारे-चेतावणी मांडण्याची मागणी. पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास जोरदार सुरू. पूर्वीच्या घटनांमुळे धरण परिसरात दक्षता वाढवण्याची गरज .परिसरात खळबळ
रावडी ग्रामस्थ शॉकमध्ये. नातेवाईकांशी संपर्क साधून वैयक्तिक पार्श्वभूमी तपासली जात आहे. जलस्रोत धोक्याबाबत जनजागृती आवश्यक.
