पुणे -प्रतिनिधी
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये नेट रन रेटच्या जंजाळात अडकलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.(Rinku Singh News) आक्रमक डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने कौटुंबिक आपत्तीमुळे अचानक संघ सोडून उत्तर प्रदेशातील मूळ गाव अलीगडला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.बीसीसीआय सूत्रांनुसार, रिंकूचे वडील खानचंद्र सिंह यांची यकृत कर्करोगामुळे प्रकृती खालावली असून, त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील सराव सत्रातही रिंकू अनुपस्थित होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या ‘मस्ट-विन'(Must ONE) सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे.(Cricket News)
सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे.विश्वचषकात रिंकूने अपेक्षेप्रमाणे खेळ दिला नाही. पाच सामन्यांत त्याने केवळ २४ धावा (सर्वाधिक ११, पाकिस्तानविरुद्ध) केल्या असून, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला. त्याच्या अनुपस्थितीमुळे मधल्या आणि फिनिशरच्या भूमिकेसाठी संघ व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.(T 20)
