Pune News : रात्री जेवण झाल्यानंतर ,पाणी प्यायला गेला, अन घोट घेण्यापूर्वीच .. आष्टीतील एमबीए विद्यार्थ्याचा वॉटर कूलरचा विजेचा धक्का लागून पुण्यात मृत्यू

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर फिल्टरमधून विजेचा जोरदार धक्का (Water Filter Shock ) लागल्याने आष्टी येथील २३ वर्षीय चैतन्य कुंडलिक चव्हाण यांचा मृत्यू झाला. १४ मार्च रोजी रात्री जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी फिल्टरजवळ गेल्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आणि गेल्या १० दिवसांपासून जहांगीर रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.(Pune Agriculture College )

एमबीए पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असलेल्या चैतन्य (Chaitanya Chavan) यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाविद्यालयातील प्रशासकीय सुरक्षाविषयक उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांनी सुविधा अपुऱ्या असल्याचा आरोप करत आंदोलन केले. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.(Student Death)

महाविद्यालय प्रशासनावर संताप

विद्यार्थी सहकारी भोजनालय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा विद्यार्थ्यांचा युक्तिवाद आहे. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करत पंधरवड्यांत अहवाल देणारी समिती नेमली. शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.(Campus Safety )

मंत्र्याची दखल आणि चौकशी

या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दखल घेत महाविद्यालयाला भेट देऊन व्यवस्थापक व प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पुण्यासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेत असे हादरवणारे प्रसंग घडणे टाळण्यासाठी सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *