Pune Crime : पुण्यातही भोंदू बाबा खरातसारखे प्रकरण … आध्यत्म शिकवण्याच्या नावाखाली केले शोषण…वाचा प्रकरण

मांजरी – प्रतिनिधी

राज्यात सध्या नाशिकमधील कथित भोंदूबाबांच्या कृत्यांने खळबळ उडालेली असताना वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya)या भोंदू बाबाचा देखील खरा चेहरा समोर आला असून, पुण्यातील एका महिलेला आध्यत्म शिकवण्याच्या नाखाली तिचे शोषण केले आहे. “मी महादेव, तू पार्वती” असा भासवून महिलेला एका लॉज वर नेत तिच्यावर बलात्कार केला. (Anti Superstition)आमची वसई संस्थेचे प्रमुख असलेल्या वैद्यवर माणिकपूर पोलिसांनी बलात्कार व ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला असून भोंदू बाबा सध्या फरार आहे.(Vashi Police)

काय आहे प्रकरण ?

फेसबुकवरून महिलेसोबत ओळख करून घेतल्यानंतर ऋषिकेश वैद्यने तिला अध्यात्म शिकवण्याचे आमिष दाखवले. आणि डिसेंबर २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील लॉजमध्ये तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार (Manjari Rape)केला व अश्लील छायाचित्रे काढली. या फोटोंचा वापर करून मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन येथे पुन्हा ब्लॅकमेल करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वसई माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, जी नंतर पुणे हडपसर मांजरी पोलीसांकडे हस्तांतरित झाली.(Pune Crime)

नाशिक अशोक खरातशी तुलना

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातप्रमाणेच वैद्यने धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलेचे शोषण केले. खरातवरही लैंगिक शोषण व फसवणुकीचे अनेक आरोप आहेत व तो पोलिस कोठडीत आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व इतर पीडित शोधण्याची मागणी तीव्र झाली आहे.पोलीस तपास वेगाने करत असून वैद्यचा शोध घेत आहेत. समाजात अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या भोंदूगिरीविरुद्ध कठोर कारवाईची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *