Bharat band : देशभरातील १२ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची मोठी हाक !

पुणे – प्रतिनिधी

देशातील १० केंद्रीय ट्रेड युनियन्सनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) देशव्यापी संप आणि भारत बंदचे आवाहन केले आहे.(Bharat band) बँक कर्मचारी, शेतकरी संघटना आणि कामगार संघटनांपासून ते विविध क्षेत्रातील संघटनांपर्यंतचा यात समावेश आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका (india -america)व्यापारी करार, मनरेगा बदल आणि खासगीकरणाच्या धोरणांविरोधात ही मोर्चेबांधणी आहे.बंदचे मुख्य कारणेनवीन चार कामगार कायदे: या कायद्यांमुळे कर्मचारी व कामगारांच्या नोकरी सुरक्षेवर, किमान वेतनावर आणि सामाजिक सुरक्षेवर आघात होत असल्याचा आरोप. कंपन्यांना कर्मचारी कमी करण्याचे अधिक अधिकार मिळत आहेत.इतर मुद्दे: भारत-अमेरिका व्यापारी करार, प्रस्तावित सीड बिल, विद्युत संशोधन बिल, SHANTI कायदा आणि ‘विकसित भारत-रोजगार व उपजीविका हमी योजना (ग्रामीण) अधिनियम २०२५’ रद्द करण्याची मागणी.समावेशी संघटना: INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या १० ट्रेड युनियन्सचा सहभाग.मुख्य मागण्याचारही नवीन कामगार कायदे पूर्णपणे रद्द करा.मनरेगाला मजबूत करा; (Bharat band)

प्रस्तावित बदल मागे घ्या.खासगीकरण थांबवा; किमान वेतन व सामाजिक सुरक्षा वाढवा.काय बंद होईल, काय चालेल?प्रभावित क्षेत्रे: बँका (सार्वजनिक क्षेत्रातील), सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक (बसेस, ट्रेन), बाजारपेठा आणि शेतकरी बाजार. केरळ, कर्नाटक, ओडिशामध्ये मोठा परिणाम अपेक्षित.शाळा-कॉलेज: देशभर अधिकृत बंद नाही, पण वाहतुकीमुळे काही ठिकाणी बंद राहू शकतात.बँकांचे कामकाज: रिझर्व्ह बँकेने सुट्टी जाहीर केलेली नाही, (Bharat band)तरी कर्मचारी संपामुळे शाखांमध्ये व्यवहार ठप्प होण्याची शक्यता. ऑनलाइन बँकिंग चालू राहील.अन्य: खासगी वाहतूक, खासगी दुकाने आणि ऑनलाइन सेवा सुरू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *