IPL 2026 ला 28 मार्चपासून सुरुवात होतेय. पहिला सामना RCB-SRH मध्ये होणार असताना, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)कर्णधार कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला. (IPL News)भरवशाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा (24) संपूर्ण हंगामातून बाहेर झाला.फेब्रुवारीत T20 वर्ल्ड कप 2026 सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना हर्षितला गुडघ्याला दुखापत झाली. मुंबईत 9 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे तो IPL साठी तंदुरुस्त नाही. (IPL Update)
गेल्या दोन हंगामांत त्याने जबरदस्त कामगिरी केली – 2024 मध्ये 19 विकेट्ससह KKR ला विजेतेपद मिळवून दिले, 2025 मध्ये 13 सामन्यांत 15 विकेट्स. 4 कोटींना राखीव ठेवण्यात आला होता.सुत्राने सांगितले, “हर्षित (Harshit Rana)उपलब्ध नाही, पण वैभव अरोरा, उमरान मलिक, कार्तिक त्यागी यांना संधी मिळेल. बदली खेळाडू अद्याप ठरलेला नाही.” मथिशा पाथिराना (18 कोटींना खरेदी) सुद्धा T20 वर्ल्ड कप (T20 Cricket) दुखापतीतून सावरतेय. मुस्ताफिजुर रेहमानला बाहेर करून झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझराबनीला (T20 WC मध्ये 13 विकेट्स) संघात घेतलंय. KKR ची तीन वेळा विजेतेपदाची मोहीम धोक्यात सध्या.
