पुणे -प्रतिनिधी
पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ५०४/२०२५ (बी.एन.एस. कलम ३०३(२)) अंतर्गत आरोपी इसम उर्फ आब्बास ऊर्फ कलिंगड सय्यद पठाणचा शोध घेताना पोलिसांना मोठे यश मिळाले. बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय सूचनेच्या आधारे पोलिस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांनी छापा टाकला. या कारवाईत १९ वर्षीय आरोपी आब्बास (रा. गल्ली नं. १९, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) चोरीच्या दुचाकी गाडीसह गाठला गेला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने आपला खरा उलगडा केला आणि पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
तपास प्रक्रियेदरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, हा आरोपी गेल्या काही महिन्यांत हडपसर, लष्कर, काळेपडळ आणि बी.एन.एस. पोलीस ठाणे हद्दीतून सातत्याने दुचाकी वाहने चोरत होता. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४ दुचाकी गाड्या जप्त केल्या, ज्यांची बाजारमूल्य २,८०,००० रुपये आहे. या जप्तीमुळे नमूद गुन्हे क्र. ५०४/२०२५, २०७/२०२५, ६८५/२०२४, ९३६/२०२५ आणि बी.एन.एस. कलम ३०३(२) संबंधित एकूण ५ गुन्हे उघडकीस आले.
मालकांना लवकरच त्यांचे वाहने परत मिळण्याची शक्यता आहे.जप्त मुद्देमालाची संपूर्ण यादी :स्प्लेंडर दुचाकी गाडी क्र. एमएच १२ टीई ३३१७ (काळेपडळ, गु.र.क्र. ५०४/२०२५)होन्डा फॅशन प्रो दुचाकी गाडी क्र. एमएच ०९ बीक्यू ९२८१ (हडपसर, गु.र.क्र. २०७/२०२५)होन्डा शाईन दुचाकी गाडी क्र. एमएच १० सीसी ६८९४ (हडपसर, गु.र.क्र. ६८५/२०२४)स्प्लेंडर प्लस दुचाकी गाडी क्र. एमएच १२ एनजी ४६६६ (बी.एन.एस., गु.र.क्र. ९३६/२०२५)पुणे शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत ५०० हून अधिक दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी फक्त ३०% गुन्ह्यांमध्ये माल जप्त झाला आहे. कोंढवा-हडपसर परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या यशामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला असला तरी पोलिसांकडून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
सदरील कारवाई डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६), सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे (हडपसर विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (काळेपडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, किशोर पोटे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली
