Pune Raid : स्पा वर रेड पडली अन् पोलिसांच्या भीतीने महिलेने बिल्डिंगवरून उडी मारली , जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी

विमाननगर (Vimannagar Spa ) परिसरातील रूट्स स्पा सेंटरमध्ये (Root Spaa Center ) वेश्याव्यवसाय चालवण्याच्या नावाखाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा (Raid)टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून पंचासमक्ष धाड टाकली. पोलिस आल्याचे कळताच गोंधळ उडाला आणि एका महिला कर्मचाऱ्याने तसेच स्पा मॅनेजरने इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला.या उडीत महिलेचा जागीच मृत्यू (Death ) झाला, तर मॅनेजर गंभीर जखमी होऊन ससून जनरल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल आहे. (Crime News)

काचेचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या पोलिसांना चार महिला आणि चार पुरुष आढळले, त्यानंतर परिसर सील करून पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage ) तपासले जात आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव (PI Govind Jadhav ) यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे विमाननगरात खळबळ उडाली असून स्पा सेंटर्समधील बेकायदेशीर व्यवसायावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मृत महिलेची ओळख पटविण्याचे आणि नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले आहे. या प्रकरणात विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू आहे.(Pune Crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *