Bhigwan Crime : लग्नाच्या पाच दिवस आधी तरुणीच अपहरण … नेमकं काय आहे प्रकरण ? … आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं. ..

पुणे -प्रतीनिधी

भिगवण (Bhigwan) परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे हारून शेख (Harun Shaikh) व आयान हारून शेख (AAyaan Harun Shaikh)(रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. (Bhigwan Crime)

अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (Gnaesh Biradar ) यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.अपहरण (Kidnap)झालेल्या तरुणीचे लग्नाच्या अवघ्या पाच दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे हेतू संभ्रमित आहे. दोघेही एकाच वस्तीत राहणारे असल्याने तपास अधिक सखोल सुरू आहे. भिगवण पोलीस स्टेशनकडून तपास जोरदार चालू असून परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.(Bhigwan Crime) हिंदू राष्ट्र संघटना व स्थानिक युवकांनी पोलिस ठाण्यात गर्दी घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. बुधवारी भिगवण बंदची (Bhigwan Band)हाक देण्यात आली असून परिसरात तणाव कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *