पुणे -प्रतिनिधी
वरळी डोम येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेत देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी अजित पवारांच्या राजकीय आणि वैयक्तिक आठवणींना उजाळा देत भावूक भाष्य केले.(Ajit Pawar)
जयंत पाटील म्हणाले, “अजित दादा आणि मी १९९१ पासून विधानसभेत जवळजवळ शेजारी बसायचो. २०१४ नंतर तर अनेकदा शेजारीच बसलो. खुल्या मनाचे, ठाम आणि विरोध करण्याची क्षमता असलेले दादा राजकारणात गोड बोलण्याचा प्रयत्न करत असलो तरी प्रामाणिकपणे रोखठोक बोलायचे.” त्यांनी अजित पवारांच्या शरद पवारांवरील निष्ठेची आठवण करून दिली की, “आरआर आबा नंतर आबा ज्येष्ठ, मग तुम्ही आणि नंतर मी, असे म्हणायचो. शरद पवारांचा (Sharad Pawar ) हुकमी एक्का अजित पवारच होते.”पाटील यांनी सांगितले की, अजित दादांना मतदारांशी थेट संवाद साधायला आवडायचे. कामाची गरज सांगितल्यास ते फोन करून ठामपणे पूर्ण करायचे. “राजकारणात पुन्हा एकत्र काम करण्याचे, संघटना मजबूत करण्याचे स्वप्न पाहत असताना नियतीने घात केला,” असेही त्यांनी नमुद केले.(Politics)
शोकसभेत उपस्थितांचे भावनिक क्षण पाहायला मिळाले, तर अजित पवारांच्या कार्यशैली आणि योगदानाच्या आठवणींनी सर्वांनाच भारावून टाकले(Pune)
