Ajit pawar death : अजित पवार यांच्या अपघातावर रामदास आठवले: ‘घातपात …. तर सखोल चौकशी आवश्यक..

पुणे – प्रतिनिधी

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर रोहित पवार (Rohit pawar )यांनी घातपाताची शंका उपस्थित केली. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas athwale) यांनी खुलासा केला. पुण्यात शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीनंतर बोलताना आठवले म्हणाले, “घातपात असावा असं मला अजिबात वाटत नाही. हा केवळ अपघात आहे.”घातपाताची शक्यता नाकारली (Ajit pawar death)
“अजित दादा हे कणखर नेते, मोठे प्रशासक व महायुतीचे अर्थमंत्री होते. ६ वेळा उपमुख्यमंत्री राहिले. कॅप्टन नावाजलेला होता, पण लँडिंगच्या वेळी चूक झाली. पुण्याकडे वळले असते तर अपघात टळला असता. त्यांच्यावर घातपात होईल असं वाटत नाही,” असं आठवले यांनी स्पष्ट केलं.विमान कंपनीवर प्रश्न
“कंपनीवर बंदी असताना विमान उडवण्याची परवानगी कशी मिळाली? प्रशासनाच्या चुका असतील. सखोल चौकशी आवश्यक आहे,” अशी मागणी त्यांनी केली.शरद पवारांची तब्येत चांगली (Ajit pawar death)
शरद पवार (sharad pawar )यांची भेट घेतल्यानंतर आठवले म्हणाले, “पवार साहेबांची तब्येत उत्तम आहे. त्यांची ‘विल पॉवर’ जबरदस्त. दोन-तीन दिवसांत पूर्ण बरे होतील. पार्लमेंटबाबत विचारलं; मी सांगितलं राज्यसभा चालते, लोकसभा गदारोळाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *