पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील आळंदी (Aalandi) येथे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून, आत्महत्येचा बनावट रचणाऱ्या मुख्य आरोपी विष्णू महादेव पावडे (Vishnu Pawade) (वय ?) ला आळंदी पोलिसांनी अटक केली. मागील सहा महिन्यांपासून पार्वती दराडे (वय ?) व विष्णू यांच्यात विवाहबाह्य संबंध चालू होते. २० फेब्रुवारी रोजी दुचाकीवर कामावर जाताना सोळू जंगल परिसरात जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. (Pune Crime)
संतापातून विष्णूने पार्वतीचा गळा आवळून हत्या केली. घटनेनंतर आत्महत्येचा भास निर्माण करण्यासाठी त्याने पार्वतीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळून दुसरा टोक झाडाला बांधला. आईला फोन करून पार्वतीने आत्महत्या केल्याचे सांगितले आणि स्वतःही आत्महत्या करणार असे भासवून फरार झाला.माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात आत्महत्येपेक्षा हत्येचा संशय बळावला. अवघ्या काही तासांत सोळू गावातून आरोपीला पकडण्यात यश आले. (Crime News)
तपासात निष्पन्न झाले की, पार्वतीच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ती विष्णूकडे वळली होती, पण विष्णूही मद्यप्रवृत्त असल्याने वारंवार वाद होत होते. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कुमार कोंडीबा गिरीगोसावी यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
