पुणे -प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी भावनिक क्षण अनुभवले. रोहित पवारांनी काकांच्या जवळीकेची आठवण सांगत त्यांच्या मोठ्या मनाची आणि राजकारणातील निष्कपटपणाची ओळख करून दिली.रोहित म्हणाले,(Rohit Pawar) अजितकाकांनीच राजकारणात (Politics) आणि आमदारकीसाठी पहिलं तिकीट दिलं होतं.(Pune News)
कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांनी माझं लग्न लावलं असं सांगत ते भावूक झाले. होणारे सासरे अजितकाकांना भेटून विचारले, ‘मुलगा कसा आहे?’ तर त्यांनी एका सेकंदात ‘नक्की द्या, तो होतकरू आणि कष्टाळू आहे’ असं उत्तर दिलं. आजारी असतानाही लग्नाला आलं आणि त्यांच्या मुलाचं लग्न असल्यासारखं वागत होते.पक्षभेद असूनही जिव्हाळा कमी झाला नाही असं रोहित म्हणाले. अजितकाकांनी कधी द्वेष ठेवला नाही असा उल्लेख करत विधानसभेत सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.(News)
