पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad police) पोलीसांनी आळंदी-चऱ्होली रस्त्यावरील ‘साई पॅलेस’ हॉटेलमध्ये (Sai palace hotel ) छापा टाकून १७ महिलांची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका केली. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजता दिघी पोलीसांनी ही कारवाई केली असून, ६ मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. छाप्याची कारवाई व अटकगुन्हे शाखेला मिळालेल्या ठोस माहितीनुसार पोलिसांनी गोपनीय मोहीम राबवली. कृष्णा सुरेश पाटील (३५), राज मोहन शेट्टी (५२), संजय अमीन बावरी (२५), साबीर अक्तर अली (३१), भरत दत्तात्रय बिराजदार (२७) व विक्रम हिरा वढ (३२) अशी अटकेची नावे आहेत.
हॉटेल चालक पद्मलोचन दास ऊर्फ कालूशेठ व मालक अवधूत गाढवे यांचा शोध सुरू आहे. पोलिस शिपाई महेश लाडेंच्या (police constable mahesh lande )फिर्यादीवरून भा.न्या.सं. कलम १४३,३ व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. (pimpri chinchwad police) महिलांचे शोषण व मुद्देमालपरराज्यातील गरीब महिलांना नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात आणून देह विक्रीस भाग पाडले जात होते. छाप्यात ५१,०७० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.
वारकरी व भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन लॉजिंगच्या नावाने हा व्यवसाय फुलला होता. परिसरातील तक्रारी व तपासआळंदी-चऱ्होली हा पुणे-पिंपरी जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने हॉटेल व्यवसाय वाढला. गेल्या काळातील अनैतिक कारभाराच्या तक्रारींनंतर ही कारवाई झाली. दिघी पोलीस (dighi police station)अधिक तपास करीत असून, पिटा कायद्यांतर्गत खटला चालवण्यात येईल.
