MSRTC …. महागाईचा आणखीन एक झटका… लालपरी प्रवास महाग! नवे दर किती जाणून घ्या

पुणे -प्रतिनिधी
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांसाठी प्राणपणाने सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) डिझेल, वंगण व देखभाल खर्च वाढल्याने सर्व प्रकारच्या बससाठी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, परिवहन मंत्री व महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या आजच्या शुक्रवारीच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीत यावर अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे,((MSRTC))

ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक महागाईचा झटका बसणार आहे.भाडेवाढीचे प्रमुख कारणेमहामंडळ सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत डिझेल व वंगण किंमतीत प्रचंड वाढ झाली असून बसच्या सोडवस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत, ज्यामुळे दुरुस्ती खर्च वाढून उत्पन्न-खर्चात मोठी तफावत निर्माण झाली आहे, ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी २% भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. यापूर्वी १४ जानेवारी २०२४ रोजी १४.९५% मोठी भाडेवाढ केल्यानंतर मंत्र्यांच्या सूचनेनुसार आता दरवर्षी टप्प्याटप्प्याने नाममात्र वाढ करण्याचे धोरण अवलंबले जात आहे.कोणत्या गाड्यांना लागू होणार?ही भाडेवाढ केवळ साध्या बसपुरती मर्यादित नसून शिवशाही,(shivshahi) शिवाई (इलेक्ट्रिक), अश्वमेध, आसनी-शयनयान, विनावातानुकूलित शिवनेरी, ई-९ व १२ मीटर इलेक्ट्रिक बसेससह ग्रामीण हिरकणी, मिडी (यशवंत) या सर्व श्रेणींना लागू होणार आहे. शेतकरी, विद्यार्थी व नोकरदारांसारख्या सर्वसामान्य प्रवाशांवर याचा थेट परिणाम होईल, जरी २% किरकोळ वाटत असली तरी मासिक प्रवासखर्चात वाढ होईल.

प्रवाशांचा रोष व सरकारची भूमिकामागील मोठ्या भाडेवाढीमुळे जनतेचा तीव्र रोष झाला होता, त्यामुळे यावेळी अल्प वाढ ठेवण्यात आली असली तरी रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही बोजा ठरेल. आजच्या बैठकीत सरकार हिरवा कंदील दाखवल्यास काही दिवसांत नवीन दर लागू होतील, म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *