Ashok Kharat Case : अशोक खरातचा नराधम चेहरा उघड! ५ एफआयआरमध्ये झोप उडवणारे विकृत कारनामे आहेत तरी काय ? वाचा

पुणे – प्रतिनिधी

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात (उर्फ भोंदूबाबा) (Ashok Kharat )यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पाच एफआयआरमध्ये दैवी शक्ती, जादूटोणा आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. ओकस प्रॉपर्टीज कार्यालयातून चाललेल्या या ‘काळ्या साम्राज्याचा’ पर्दाफाश झाला असून, बीएनएस कलम ६४(१), ७४, ७५, ३५१(२) आणि महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत.

एफआयआर १
:

तांब्याच्या बाटलीत मंत्रित पाणी, गर्भपात धमकी

फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ या काळात खरातने पीडित महिलेला ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात बोलावले. तांब्याच्या बाटलीतून मंत्रित पाणी पाजून धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. ती गरोदर राहिल्यावर गर्भपाताच्या गोळ्या दिल्या व नकार दिल्यास मुलांचे वाईट होईल अशी धमकी दिली. जडीबुटीचे औषध दिले.(Nashik Crime)

एफआयआर २:

गरोदर पत्नीवर बलात्कार, लघवी पाजली

नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ दरम्यान गरोदरपणाच्या विधीच्या बहाण्याने पत्नीला बोलावून छाती-पोटावर हात फिरवून गुप्तांगात बोट घालून बलात्कार. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी. नकली साप-वाघ दाखवून भीती, लघवी पाजून अघोरी कृत्ये.
एफआयआर ३:

‘माझ्यात दैवी शक्ती’, छातीला स्पर्श

७-१२ ऑक्टोबर २०२४ ला पतीला बाहेर पाठवून काळा दगड फिरवून मंत्र (Black Magic Case ) फुसफुसत छातीला स्पर्श. ‘माझा स्पर्शाने कल्याण होईल, शुद्धी झाली नाहीतर देव कोपेल’ अशी धमकी.(Government Wada Police )

एफआयआर ४:

पेढा-तांब्याचे पाणी, गुंगी करून बलात्कार
एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ ला मुलगा व्हावयासाठी बोलावून तांब्याचे पाणी-पेढा देऊन गुंगी करून शारीरिक संबंध. ‘मी देवाचा अवतार, शुद्ध झालीस, सांगितले तर कोप’ असे धमकवले.(Anti Black Magic Act)

एफआयआर ५:

‘शंकर अवतार’, सर्पदंश धमकी

जुलै २०१४ ते डिसेंबर २०२४ ला ‘शंकर अवतार’ म्हणवून मिठाई देऊन मंत्र फुसफुसत बलात्कार. नकार दिल्यास मुलांना सर्पदंशाने जिवंत जळतील अशी भीती.
प्रकरणात आतापर्यंत ५-७ गुन्हे दाखल, तपास सुरू. खरातला कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील चौकशीकडे लक्ष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *