Pune Crime : कोथरूडेत बारावी पेपरनंतर कोयत्याने हल्ला; अल्पवयीन आरोपी ताब्यात

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील कोथरूड (Kothrud) भागात मंगळवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. बारावीचा पेपर (12Th Paper)देऊन बाहेर पडलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्यावर तीन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार केले. जखमीवर उपचार सुरू असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी आणि आरोपी हे एकाच शाळेतील माजी सहकारी आहेत.( CRime News )

दोन वर्षांपूर्वी शाळेत झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी कट रचला. त्यांनी विद्यार्थ्याच्या परीक्षा केंद्राची रेकी करून हा हल्ला केला. परीक्षा संपवून आनंदात बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी धारदार कोयत्याने अचानक हल्ला चढवला.महाविद्यालय परिसरात आणि भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कोथरूडेत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *