Pune Crime : बाळा तुला चॉकलेट देतो माझ्यासोबत चल .. अन् नराधमाने ४ वर्षाच्या चिमुकलीवर केला अत्याचार ; पुणे स्टेशन वरील धक्कादायक घटना

पुणे – प्रतिनिधी

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर चार वर्षांच्या चिमुकलीवर  (4 -year-old child;)झालेल्या पाशवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. हातावर पोट असलेल्या ऊसतोड कामगार कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एका नराधमाने या निरागस बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.मध्य प्रदेशातील हे कुटुंब ऊसतोडणी हंगाम संपवून गावी परतण्यासाठी १६ फेब्रुवारीच्या रात्री पुणे स्थानकावर पोहोचले होते. सोबत चार लहान मुले आणि प्रवासाचा थकवा घेऊन ते प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ वर मुक्कामाला थांबले होते.(Pune Station )
मध्य प्रदेशला जाणारी गाडी सकाळी असल्याने कुटुंब गाढ झोपेत होते. मध्यरात्रीच्या सुमारास शेजारी बसलेल्या आरोपीने संधी साधली. त्याने चिमुकलीला चॉकलेट आणि बिस्किटाचे आमिष दाखवून प्लॅटफॉर्मच्या निर्जन, (Pune CRIme)अंधाऱ्या कोपऱ्यात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.या घटनेचे सर्वात भयावह पैलू म्हणजे ‘परिचित असण्याचा आभास’. आरोपी हा परप्रांतीय असून कुटुंबाच्या शेजारीच बसला होता. प्राथमिक ओळख झाल्याने आई-वडिलांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. या विश्वासाचा फायदा घेत त्याने पालकांपासून अवघ्या काही दूरवर असलेल्या चिमुकलीला उचलले. बालिकेच्या ओरडेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, तर जखमी बालिकेची रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *