पुणे -प्रतीनीधी
लोकप्रिय हिंदी-पंजाबी रॅपर बादशाह त्याच्या आलिशान आयुष्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी त्याने १२.४५ कोटींची रोल्स-रॉयस कलिनन सिरीज II खरेदी करून सगळ्यांचे डोळे कोरडे पाडले. याने तो मुकेश अंबानी, शाहरुख खान आणि अजय देवगणसारख्या दिग्गजांसोबत यादीत सामील झाला – पहिला भारतीय संगीतकार म्हणून!कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत बादशाहने खुलासा केला,
“हा निर्णय सुपर अचानक होता! मला ती कार हवीच हवी असे वाटले आणि लगेच ‘आजच घ्या’ म्हणत ठरवलं. पण तो उत्साह फक्त १०-१५ मिनिटांचाच टिकला. मग विचार आला – ‘आता पुढे काय?'”त्याचं म्हणणं, ही कार घेणं म्हणजे चेकलिस्टमधील टिक मारण्यासारखं! तो सांगतो, “मला टॉप टेक्नॉलॉजीची सगळीच गोष्ट हवी असते. लोक म्हणतात ही बेस्ट कार आहे, म्हणूनच घेतली.” पण लक्झरीवर कोट्यवधी खर्च करणारा बादशाह किंमत आधीच तपासतो.लक्झरीची खरी लत!
बादशाहला लिमिटेड एडिशन घड्या आवडतात – त्यांची किंमत वेळेनुसार वाढते. आई-वडिलांना मात्र खरी किंमत सांगत नाही, “त्यांना विश्वासच बसेना!” चांगले कपडे, गाड्या, शूज आवडतात, पण “वस्तूंपेक्षा नात्यांना प्राधान्य,” असंही तो म्हणाला.
