Pune Crime : उद्योजकाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी धमकी देणार्‍या दामपत्त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या बेड्या ; 7 जणांवर गुन्हा दाखल … काय आहे प्रकरण?

पुणे -प्रतिनिधी

व्याजाने पैसे घेतलेल्या महिलेला धमकावून एका दाम्पत्याने तिला प्रतिष्ठित व नामांकित असलेल्या बारामतीतील (Baramati)एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दाम्पत्याने अनेक व्यावसायिक व उद्योजकांना जाळ्यात अडकवल्याची शक्यता असून, पोलिस सखोल तपास करीत आहेत.

याशिवाय, त्याच महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकारही उघड झाला आहे.या प्रकरणी भारती विद्यापीठ (Bharati VIdhyapith Police Station) पोलिसांनी प्रताप रमेश जाधव (Pratap Jadahv)(वय ४५) व पल्लवी प्रताप जाधव (Pallavi Jadhv)(वय २८, रा. भिंताडेनगर, आंबेगाव, कात्रज) असे अटकेत घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत. २८ वर्षीय तक्रारदार महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल केला होता. ही विभक्त पतीपासून वेगळे झालेली असून एकटीच राहत होती. २०२४ मध्ये तिची जाधव दाम्पत्याशी ओळख झाली व त्यांनी तिला भाड्याने त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. नंतर ती भाडेकरू म्हणून तिथे राहू लागली. या काळात महिलाने आरोपींकडून २ लाख रुपये महिन्याला ५ टक्के व्याजाने घेतले व व्याजासह मुद्दल मिळून एकूण ३ लाख ६० हजार रुपये परत केले. तरीही आरोपींनी धमक्या देऊन अधिक पैसे मागितले. विशेषतः २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रताप जाधवची पत्नी घराबाहेर असताना त्याने महिलेवर अत्याचार केला.(Pune Crime)

पोलिसांकडे (Pune Police ) जाण्याचा प्रयत्न केल्यास तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपी दाम्पत्याने दिली.ऑक्टोबर २०२५ मध्ये जाधव दाम्पत्याने बारामतीतील उद्योजकाविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यासाठी महिलेवर दबाव टाकला. खोटी तक्रार केल्यास २० ते २५ लाख रुपये व बारामतीत फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. महिलाने मात्र नकार दिला. दरम्यान, आरोपींनी अशाच प्रकारे इतर व्यावसायिक व उद्योजकांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी तपास करून दाम्पत्याला अटक केली. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे(PI Rahulkumar Khilare), सहायक निरीक्षक स्नेहल थोरात (API Snehal Thorat ), उपनिरीक्षक निलेश मोकाशी (PSI Nilesh Mokashi)व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.पोलिसांनी आवाहन केले आहे की, जाधव दाम्पत्याने जाळ्यात अडकवून अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती मिळाली असल्याने, असा प्रकार झाल्यास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *