पुणे -प्रतिनिधी
मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane Death Case) आत्महत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. नवविवाहित वैष्णवीला माहेरकडून पैसे घेवून येण्यासाठी तगादा लावून तिच्या सासरच्या छळाला कंटाळून त्याने १६ मे रोजी आत्महत्या केली. आता या प्रकरणात सहा जणांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ-मारहाण, कट रचणे आणि पुरावे लपवण्याचे आरोप निश्चित झाले आहेत. खटल्याची सुनावणी २३ फेब्रुवारीपासून पुण्याच्या न्यायालयात सुरू होणार असून, कोर्ट काय शिक्षा सुनावते हे पाहणे महत्वाचे ठरेल.हगवणे कुटुंबासह इतरांवर गंभीर आरोपआरोपींमध्ये पती शशांक हगवणे ( shashank hagwane) (मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे), सासरे राजेंद्र हगवणे व सासू लता हगवणे (मानसिक छळ), तसेच इतर तीन जणांचा समावेश आहे. विशेषतः निलेश चव्हाणवर (nilesh chavan )वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे व धमकावण्याचे अतिरिक्त आरोप आहेत.
हे सर्व पुरावे पुढील सुनावणीत सादर केले जाणार आहेत.वैष्णवीच्या मृत्यूनंतर (Vaishanavi Hagwane Death Case) घडले काय?१६ मे रोजी वैष्णवीचा मृतदेह सासरच्या घरी आढळला. दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांच्या तक्रारीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुलैमध्ये आरोपपत्र कोर्टात दाखल झाले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुण्यात विविध सामाजिक संघटना व महिलांनी कोर्टाबाहेर आंदोलने केली होती. त्यांनी हगवणे कुटुंबाला (hagwane family )फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आता कोर्ट प्रकरणाची पुनः सुनावणी घेऊन शिक्षा ठरवेल (Vaishanavi Hagwane Death Case)
