पुणे -प्रतिनिधी
पुण्यात दोन ऐतिहासिक व्यक्तींवरील वादग्रस्त विधानामुळे राजकीय तणाव वाढला असून, भाजपच्या आंदोलनात दगडफेक झाल्याची घटना घडली. यामुळे भाजप-काँग्रेस संघर्ष अधिक चिघळला आहे.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या वक्तव्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा दावा करून भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (BJP Dhiraj Ghate) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (Pune News)
पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे.आंदोलन हिंसक झालेभाजपने काँग्रेस भवनासमोर (Congress Bhavan )निषेध आंदोलन केले, ज्यात दगडफेक झाल्याचा आरोप आहे. काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले असून, पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणली.काँग्रेसकडून (Politics) पलटवारकाँग्रेस कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस (Pune News) ठाण्याबाहेर धरणा दिली आणि भाजपवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (Pune BJP – Congress Clash ) शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “वेळीच कारवाई झाल्यास हिंसा टाळता आली असती.” दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, पोलिस तपास करत आहेत.(Congress Bhavan )
