पिंपरी-चिंचवड -प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad mahanagarpalika ) महानगरपालिका निवडणुकीत वाकड प्रभाग २५(ए) मधून विजयी झालेल्या भाजप नगरसेवक कुणाल वैजनाथ वाव्हळकर (nagarsevak kunal vavhalkar)यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनीच न्यायालयात धाव घेतली आहे. अवैध बांधकाम व खोट्या प्रतparamname pledgedमुळे त्यांचे पद रद्द करण्याची मागणी त्यांनी निवडणूक याचिकेत केली आहे.खोटी माहिती व अतिक्रमणाचा आरोपकुणाल वाव्हळकर यांनी राष्ट्रवादीच्या विक्रम वाघमाऱ्यांचा १०,२१८ मतांनी पराभव करून निवड घेतली.
मात्र, उमेदवारी अर्जात सर्व्हे नं. १७७ व १७८ वरील अवैध बांधकामांची माहिती लपवली, तर कौटुंबिक माहितीत एका मुलीऐवजी दोन अपत्ये असल्याचे चुकीने नमूद केले, असा आरोप प्रज्ञा यांनी केला आहे. नामनिर्देशनपत्रासोबतचे शपथपत्र खोटे असल्याने निवडणूक आयोगाची दिशाभूल झाली, असेही त्या म्हणतात.कौटुंबिक वाद व तक्रारी२०१३ मध्ये विवाह झालेल्या या दाम्पत्यात कौटुंबिक कलह असून, घटस्फोट खटला प्रलंबित आहे. प्रज्ञा यांनी वाकड पोलीस ठाण्यात (wakad police station) तक्रार दिल्याने कुणाल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ३१ डिसेंबर २०२५ रोजी हरकत घेतली, तरी दखल न घेतल्याचा आरोप आहे. कुणाल यांचे म्हणणे, न्यायालयाने प्रज्ञा यांना पोटगी दिलेली आहे.निवडणूक काळातील संघर्षमहापालिका निवडणुकीत कुणाल (भाजप) (BJP)व प्रज्ञा (अपक्ष) आमनेसामने होते. निवडणूक काळात कुणाल यांनी प्रज्ञा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणाचा निकाल प्रलंबित असून, पती-पत्नींमधील हा वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
