पुणे -प्रतिनिधी
आमदार रोहित पवार (aamadar Rohit Pawar) यांनी अजित पवारांच्या विमान अपघात (Ajit Pawar Accident Death ) प्रकरणात गंभीर आरोप करत व्हीएसआर कंपनीला संरक्षण दिल्याचा दावा केला. विमान इंधनाने भरलेले असून अतिरिक्त इंधन डबे साठवले गेले होते, उड्डाण योजना चेन्नई डीजीसीएला पाठवली नाही आणि पुणे-सोलापूर विमानतळ पर्यायी ठेवले गेले होते, असे सांगत त्यांनी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
यानंतर अजित पवारांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar )यांनी भावूक पोस्ट लिहून विमान अपघाताची सखोल चौकशीची मागणी केली. ‘ब्लॅक बॉक्स (Black Box )सहज नष्ट होऊ शकत नाहीत, जनतेला पारदर्शक सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे,’ असे म्हणत त्यांनी व्हीएसआरला उड्डाण बंदी घालून गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. पोस्टच्या शेवटी ‘मिस यू डॅड’ असा उल्लेख करून त्यांनी वेदना व्यक्त केल्या.
