Ruby Hall रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात मृतदेहाची चूक आदलाबदली; नातेवाईकांचे आंदोलन, कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

 

पुणे: प्रतिनिधी

रुबी हॉल क्लिनिकच्या शवागारात खात्री न करता महिलेचा मृतदेह दुसऱ्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले. कोरेगाव पार्क पोलिसांनी शवागृह प्रभारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. क्लिनिकने चुकीचा खुलासा करून सारवासारव केल्याचा आरोप आहे.काय

घडले?१९ जानेवारी रात्री ११ ते २० जानेवारी पहाटे साडेतीन दरम्यान ही घटना घडली. यश कल्याणराव भगत (२७, माळेगाव, बारामती) यांच्या नात सुनिता पांडुरंग भगत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह शवागारात ठेवला असता, नावातील साम्यामुळे तो दुसऱ्या महिलेच्या नातेवाईकांना दिला गेला. ते रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन गावाकडे निघाले.भगत कुटुंब शवागारात पोहोचल्यावर मृतदेह सापडला नाही. खळबळ उडाली आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.

पोलिसांनी चौकशी केली तेव्हा उघड झाले की, कर्मचाऱ्यांनी एमएलसी नीट तपासले नाही. दुसऱ्या नातेवाईकांना संपर्क साधून मृतदेह परत बोलावला गेला. क्लिनिककडून ‘ससून शवागार दुरुस्तीखाली’ असा चुकीचा खुलासा देण्यात आला.पोलिस कारवाईतक्रारीनुसार, कर्मचाऱ्यांनी संगनमताने माहिती दडपली व मृतदेहाची अप्रतिष्ठ झाली. कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *