Pune ACB Trap : पुण्यात लाचेचा दुसऱ्या दिवशीही थरार; वनक्षेत्र सर्व्हेक्षक 4 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

पुणे – प्रतिनिधी

पुण्यात लाचखोरीचा (Pune ACB) दुसऱ्या दिवशीही थरार पुणेकरांना अनुभवयाला मिळाला असून, ७ लाखांच्या लाचेची मागणीकरून ४ लाखांची लाच स्विकारताना पुणे लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पुण्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Bribery) जमिनीच्या सातबारावर लागलेलेल खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे समोर आले आहे.(Forest Surveyor )

उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, रा. सातारा) (Uday sing Kumbhar )असे पकडण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पुणे एसीबीने सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार हे जमीन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करतात. त्यांची वडगाव मावळ भागात जागा असून, त्या जागेवर खासगी वनाचे शेरे लागले होते. त्यासंदंर्भात त्यांनी वनविभागाच्या उपवनसंरक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. हा अर्ज वनक्षेत्र सर्व्हेक्षक उदयसिंग यांच्याकडे गेला होता. तक्रारदार त्यांना भेटले असता ते शेरे काढण्यासाठी लोकसेवक उदयसिंग यांनी त्यांच्याकडे ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.(7 Lakh Bribe) त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. (ACB Raid)

त्याची पडताळणीकरून रविवारी दुपारी एसीबीने सापळा रचला. या सापळा कावाईत लोकसेवक उदयसिंग कुंभार यांना चार लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *