हडपसर – प्रतिनिधी
हडपसरमधील मगरपट्टा सिटी परिसरात कालव्याला भगदाड (Magarpatta Canal Burst ) पडल्याने सोमवारी (२३ मार्च) सकाळपासून मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर १ ते २ फूट पाणी साचले. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.(Hadapsar Flood )
सोलापूर रस्ता व अहिल्यानगरहून येणारी वाहने या रस्त्याचा वापर करतात. कालवा फुटताच वाहतूक शाखेने घटनास्थळी धाव घेतली आणि रस्ता बंद (Pune raffic )करून वाहने वळविली. मुंढवा चौकात लांब वाहनरांगा लागल्या असून, १०-१२ तास पाणी साचण्याची शक्यता आहे.(mundhwa Traffic)
वाहतूक शाखेचे आवाहन: पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी सांगितले, “परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे.(Traffic Jam)
वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावेत, अन्यथा अपघात होण्याचा धोका आहे.”
पर्यायी मार्ग
हडपसर ते मुंढवा: वैदूवाडी चौक – शिंदे वस्ती – शिर्के कंपनी रस्ता – जहांगीर नगर – ताडीगुत्ता मार्गे मुंढवा चौक.
२३ एव्हेन्यू मॉलहून: सोलापूर रस्ता – काळूबाई मंदिर चौक – बी.टी. कवडे रस्ता – घोरपडी गाव – पिंगळे वस्ती – ताडीगुत्ता चौक – मुंढवा.
खराडीहून: मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक – घोरपडी रेल्वे उड्डाणपूल – बी.टी. कवडे रस्ता – हडपसर.
मुंढवाहून हडपसर: मुंढवा चौक – ताडीगुत्ता – जहांगीर नगर – शिर्के कंपनी – डॉ. आंबेडकर चौक – शिंदे वस्ती – वैदूवाडी – हडपसर.
सोलापूर रस्त्याहून मुंढवा: १५ नंबर चौक – मांजरी – झेड कॉर्नर – लोणकर वस्ती – केशवनगर – मुंढवा चौक.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करून वाहतूक पोलिस सतर्क आहेत. कालव्याची दुरुस्ती होईपर्यंत पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश आहेत.
