शिरुर – प्रतिनिधी
शिरूर (Shirur) तहसील कार्यालयात (Shirur Tehsil) सातबारा व फेरफार उताऱ्यांच्या नकलांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (ACB Raid)विभागाने (एसीबी) शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी सापळा रचून एका कंत्राटी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत एका खाजगी इसमालाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Bribery Busted)
कोणाला पकडले?कंत्राटी सुपरवायझर सुरज शरद थोरात (वय 34) (Suraj Thorat) आणि खाजगी इसम महेश बाबुराव भोसले (वय 45)(Mahesh Bhosale) अशी लाच घेताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 34 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.कशी घडली घटना?तक्रारदार हा शिरूर तालुक्यातील घोटी मळा येथील वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा व फेरफार उताऱ्यांसाठी 27 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर 12 मार्च रोजी अभिलेख कक्षात गेले असता त्यांची भेट सुरज थोरात यांच्याशी झाली. थोरात यांनी कागदपत्रांच्या नकलांसाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली.(Land Records)
तक्रारदाराने 18 मार्च रोजी एसीबी कार्यालयात लेखी तक्रार दिल्यानंतर 20 मार्च रोजी केलेल्या पडताळणीत थोरात यांनी पुन्हा तेवढी लाच मागून ती घेण्याची तयारी दाखवल्याचे उघड झाले.(Pune ACB) तसेच महेश भोसले यांनी थोरात यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.सापळा आणि कारवाईशुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजता शिरूर तहसील कार्यालयात एसीबी पथकाने सापळा रचून थोरात यांना पंचांच्या उपस्थितीत तक्रारदारकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे यांच्याकडे आहे. शिरूर तहसील कार्यालयात सातबारा व फेरफार उताऱ्यांसाठीच लाचखोरी उघड झाल्याने महसूल विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (CorruptionFree)
