पुणे -प्रतिनिधी
पांढरेवाडी मुकादमवाडीतील इटरनेस कंपनीच्या सेवा रस्त्यावर शनिवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पोने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली.(Accident News) दुचाकीवरील भरत संतोष जाधव (Bharat Jadhav)(रा. मळद, ता. दौंड) याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक स्वप्नील दत्तात्रय सुतार (Swapnil Sutar) (२१, शेती, मळद) गंभीर जखमी झाला. (Daund Accident)
कुंजीरवाडीतून चहा पत्ती घेऊन मळदकडे जात असताना MH-10-EJ-9111 टेम्पो चालक चंद्रकांत आसराजी शेंबडे (रा. धाखंटा, गेवराई, बीड) याने भरधाव वेगाने धडक दिली. भरत यांच्या डोक्यावर, पोटावर व हात-पायांना गंभीर दुखापती झाल्या, तर स्वप्नील यांना किरकोळ जखम झाल्या. दुचाकीचेही नुकसान झाले.
स्वप्नील सुतार (Swapnil Sutar ) यांच्या फिर्यादीवर दौंड (Daund Accident) पोलीसांनी भाजी संहिता १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) व मोटार वाहन कायदा १८४, १३४, १७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास हवालदार पठाण करीत आहेत.
