Eknath Shinde : आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पुणे -प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Attack) येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुली आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. नवलकिशोर राम (Navalkishor Ram ) यांना दिले आहेत.हल्ल्यानंतर कुटुंबाला धीर देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जगदाळे कुटुंबाची भेट घेतली होती.(Eknath Shinde)

संतोष यांच्या पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरी (Aasawari ) यांचे सांत्वन करताना आसावरीला सरकारी नोकरीचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार आयुक्त राम यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना आसावरीला प्रत्यक्ष बोलावून तिच्या शिक्षणाला अनुरूप पद तयार करून नेमणूक करण्याचे आदेश दिले.”शासन सहानुभूतीने हा निर्णय घेत आहे.

विशेष बाब म्हणून तिच्या नियुक्तीला तात्काळ मंजुरी मिळेल,” असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांनी सांगितले. लवकरच आसावरीची शासकीय सेवेतील प्रक्रिया पूर्ण होणार असून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *