Govinda : गोविंदा-सुनीता नात्यात मतभेद? गोविंदाने अफेअरच्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर … काय घडले

पुणे – प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता गोविंदा (govinda )सध्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे स्पॉटलाइटमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं सुनीता आहुजा यांच्याशी नातं तणावपूर्ण असल्याच्या बातम्या येत आहेत.अलीकडील मुलाखतीत पत्नीच्या अफेअर आरोपांवर गोविंदाने प्रत्युत्तर दिलं. “माझ्यावर कधी आरोप झाले नाहीत? सुरुवातीला अभिनेत्रींना हात लावतानासुद्धा हात थरथरायचे. आता हे आरोप करणारी व्यक्ती माझं बालपणीचं प्रेम आहे. तरुणपणीचं प्रेम सोडून गेलं, आता हे म्हातारपणीचं प्रेम (love)आहे,” असं त्याने म्हटलं. तसंच, “चार सुपरस्टार व मिस युनिव्हर्स अभिनेत्रींसोबत काम केलं; एकानेही त्रास दिल्याचा आरोप नाही.

माझ्या प्रॉडक्शनमधून करिअर सुरू केलेल्या हिरोईनबद्दल चुकीचा विचार करू शकत नाही,” असंही स्पष्ट केलं.या मुलाखतीनंतर सुनीता आहुजा यांनी सोशल मीडियावर जुना फोटो शेअर केला. फोटोत गोविंदा सूट-बूटमध्ये, सुनीता साडीत आणि त्यांची दिवंगत आई निर्मला देवी दिसत आहेत. कॅप्शन: “जुने चांगले दिवस लवकरच येतील, जय माता दी.” त्यांची लेक टीना आहुजाने यावर कमेंट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *