Baner : बाणेरमध्ये पैशांसाठी स्वतःच्या च अपहरणाचा ड्रामा; तरुणाने वडीलांनाच २ लाखांची खंडणी मागितली…. वाचा नेमकं काय प्रकरण

पुणे -प्रतिनिधी

प्रयागराज येथील २१ वर्षीय मनीषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी याने वडील-भावाकडून दोन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव रचला. बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(Baner Crime)

बारावीत नापास झाल्यानंतर पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मनीषकुमारने ९ फेब्रुवारीला गावी येणार असल्याचे सांगितले. मात्र रात्री त्याचा फोन बंद गेल्याने संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅपवर “सहा तासांत दोन लाख रुपये जमा करा अन्यथा ठार मारू” अशी धमकी देण्यात आली.(Crime News)

भावाने पुण्यात येऊन बाणेर पोलीस ठाण्यात (bnaer Police station) तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पीआय चंद्रशेखर सावंत, पीआय अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू झाला. मनीषकुमार शहरात रिक्षाने फिरत असल्याचे आणि म्हाळुंगे येथे मित्राकडे जायचे असल्याचे उघडकीस आले. तो अहमदाबादमार्गे प्रयागराजला गेल्याचे समोर आल्यानंतर सहायक पीआय कैलास डाबेराव (APi Kailas Daberav )यांच्या पथकाने नातेवाईकांच्या मदतीने त्याला पुण्यात आणले.

चौकशीत पैशांसाठी अपहरणाचा ड्रामा (Kidnap Drsma ) रचल्याची कबुली दिली असून कुटुंबीयांनी १० हजार रुपये ऑनलाइन जमा केले होते. खंडणी मागणीचा गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.(crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *