Eknath khadse … एकनाथ खडसे यांना न्यायालयाचा दणका … थेट अजामीनपात्र वॉरंट … ते प्रकरण …

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील भोसरी (bhosari)जमिनी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse ) व त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (warrant)जारी केले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भोसरी येथील एमआयडीसी जमिनीच्या खरेदी-विक्रीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर आहे.

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) खडसे ((Eknath khadse ) दाम्पत्य, जावई गिरीश चौधरी व काही कंपन्यांविरुद्ध १००० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात मनी लाँड्रिंगसारखे गंभीर आरोप आहेत. यापूर्वी न्यायालयाने खडसे यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला होता.शुक्रवार (६ फेब्रुवारी) रोजी झालेल्या सुनावणीसाठी खडसे दाम्पत्य न्यायालयात हजर झाले नाही. त्यांच्या गैरहजरेची दखल घेत न्यायालयाने लगेच अजामीनपात्र वॉरंट (warrant)जारी केले. या प्रकरणात आरोप निश्चित होण्याची शक्यता होती, पण अनुपस्थितीमुळे कारवाई झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *