पुणे -प्रतिनिधी
जिल्हा परिषद(zp election) व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारण सोडून नाती जोडण्याचा सकारात्मक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन” या पोस्टने तरुणांकडून धुमाकूळ घातला आहे.निवडणुकीत (election ) गावोगावी गटबाजीमुळे भावकी, नातेवाईक आणि मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पक्षनेते आरोप-प्रत्यारोप करतात, पण कार्यकर्ते पुढील निवडणुकांपर्यंत वैर धरतात.
यात भावंडांनाही नाती विसरावी लागतात.व्हायरल संदेश: “राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची. मतदान संपले, आता परिसर, मित्र-भावकी जपा. थोड्या दिवसांची निवडणूक विसरून शेजारधर्म जोडा.” हा संदेश युवक सोशल मीडियावर (social media)शेअर करत आहेत.या ट्रेंडचे सर्वत्र कौतुक होत असून, निवडणुकीनंतरचा तणाव कमी होण्यास मदत झाली आहे.(pune )
