पुणे -प्रतीनिधी
पुणे हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती परिसरात वेश्याव्यवसाय चालू असल्याचा बनावट कॉल करून लोणी काळभोर पोलीसांची (Loni kalbhor police) दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला.
गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी एक वाजता बीट मार्शल अंकुश गणपत घुले यांच्या एमडीटी डिव्हाइसवर इंदिरानगरात मुलींना जबरदस्ती वेश्याव्यवसायाला भाग पाडल्याचा कॉल आला. तत्काळ घटनास्थळी धावत गेलेल्या पोलिसांना मात्र कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नाही(Pune Police)
.त्याच क्रमांकावरून वारंवार कॉल येत राहिले, प्रत्येक वेळी तपासात खोटेपणा उघड झाला. एक दिवस आधी (१८ फेब्रुवारी) हॉस्टेल परिसरात कॉलेज मुलींकडून वेश्याव्यवसाय (Sex Racket) व गांजा विक्रीचा देखील खोटा कॉल आला होता, ज्याची पोलिसांनी पडतळणी केली. या जाणीवपूर्वक गैरवापरामुळे पोलिसांची धावपळ उडाली असून, संबंधित मोबाईल क्रमांकधारकावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २१७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
