Daund : दौंड तालुक्यात उसाच्या पाचटाच्या आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी

दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे उसाच्या शेतातील पाचट जाळताना ६९ वर्षीय शेतकरी जालिंदर भालचंद्र भाडळे (Jalindar Bhadale) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू ( Death) झाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीड वाजता ऊस तोडणीनंतर उरलेले पाचट नष्ट करण्यासाठी आग लावली असता वाऱ्याने आगीने क्षणात उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण शेत व्यापले.

चारही बाजूंनी वेढा घालणाऱ्या ज्वाळांमधून भाडळे यांना बाहेर पडता आले नाही, धुराच्या लोटांमुळे शोधमोहीम उशिरा सुरू झाली आणि ते गंभीर भाजलेल्या अवस्थेत आढळले.शेजारील शेतकऱ्यांनी त्यांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. मृतदेह (Death Body) शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पारगाव परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी बांधवांनी दुःख व्यक्त केले आहे.(Pune )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *