पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बावधन पोलिसांनी ( Bavdhan Police Station )अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत महाळुंगे केडीपी अर्धवन येथील लेबर कॅम्प परिसरात कारवाई करत मोहम्मद सरफुद्दीन खालिद (32, मूळ बिहार) याला अटक केली.
१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता संशयावरून झाडती घेतल्यावर त्याच्याकडून ६१ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त झाला.सहिल प्रॉपर्टीज रस्त्यावर नजर ठेवत पोलिस शिपाई दत्तात्रय शिंदे (police constable Dattatrya Shinde)यांनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल (Crime News )झाला असून,
पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
