अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे यांनी १४ फेब्रुवारी रोजी लोणी काळभोरमधील कृपासिंधु ईस्ट सोसायटीसमोर छापा टाकून गांजा विक्रीसाठी वाहतुक करणाऱ्या अक्षय पोपटराव पाडुळे (३१, हडपसर) (Akshay Padule) आणि विशाल दत्तात्रय जाधव (Vishal Jadhv) (२८, हिंगणे मळा) यांना ३४ किलो ४४० ग्रॅम (६.८८ लाख) गांज्यासह अटक केली. एनडीपीएस कायद्यांतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.तपासात धुळे-नंदुरबारमधील पुरवठादारांची माहिती मिळाली, म्हणून १८ फेब्रुवारी रोजी प्रभारी पीआय वाहीद पठाण यांच्या पथकाने डोंगराळ भागात सापळा रचला.(Pune Crime)

मंगेश जाण्या पावरा (२९, भोगावडे खुर्द, नंदुरबार) ला पकडलं, त्याच्याकडून ज्ञानेश्वर मगन पावरा (२५, सांगवी, धुळे) ची माहिती मिळाली. मुंबई-आग्रा हायवेवर त्याला ९ किलो ४२० ग्रॅम (१.८७ लाख) गांजा आणि होंडा कारसह (५ लाख) अटक केली.एकूण ४ आरोपींना जेरबंद करून ४३ किलो ७६ ग्रॅम गांजा (२१.९१ लाख), दोन होंडा कार (औरा आणि दुसरी) आणि ५ मोबाइल जप्त करण्यात आले(Crime News)

सदरील कामगिरी पोलीस उप आयुक्त, श्री निखील पिंगळे,(DCP Nikhil Pingale) मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्शंकर खटके यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक . वाहीद पठाण(PI Vahid Pathan), सहा. पो. निरी. अनिल सुरवसे, (API Anil Surwase) सहा. पो. फौज. भिंगारे (API Bhingare), पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिके व शेलार यांचे पथकाने केली.(Pune Police )