Pune crime … मुलींनो ऑनलाईन कॅब बुक करताय ? सावधान बाणेर मध्ये महिलेसोबत घडले अनपेक्षित कृत्य

पुणे -प्रतिनिधी

पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाणेर परिसरात मोबाईल अॅपवरून कार बुक केलेल्या ४२ वर्षीय महिलेचा चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. भाडेवाडातून सुरू झालेल्या या प्रकाराने शहरातील प्रवासी सेवा आणि women safety वर गंभीर चिंता व्यक्त होत आहे. बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध तीव्रतेने सुरू आहे.किरकोळ वादातून भयावह वळण१ फेब्रुवारी रोजी सकाळी पीडित महिलेच्या प्रवासासाठी एका प्रसिद्ध मोबाईल अॅपवरून कार बुक करण्यात आली होती. संपूर्ण प्रवास सुरळीतपणे पार पडला आणि महिलेचे घरापर्यंत पोहोचले.
मात्र, बाणेर भागात कार थांबताच भाड्याच्या रकमेवरून चालक आणि महिलेत किरकोळ वाद झाला. सुरुवातीला हा वाद सामान्य वाटत होता, पण चालक संतप्त होऊन महिलेशी हुज्जत घालू लागला. अचानक त्याने वादाला वेगळे वळण दिले आणि महिलेचा विनयभंग केला. ही अनपेक्षित कृत्य घडताच महिला प्रचंड घाबरली आणि मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून चालक घटनास्थळावरून पळून गेला.तक्रारनंतर तपासाला वेगघटनेनंतर पीडित महिलेनं धैर्य धरून तात्काळ बाणेर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकार सविस्तर सांगितला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तातडीने चालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मोबाईल अॅपमधील प्रवास डेटा, वाहन क्रमांक, चालकाचे नाव आणि इतर तपशील आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम जोरदार सुरू आहे.

बाणेर पोलिस सखोल तपास करत असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.या प्रकरणाने शहरातील महिलांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, महिलांनी प्रवासादरम्यान नेहमी सतर्क राहावे, अॅपचे आपत्कालीन बटण किंवा SOS फीचर वापरावे आणि कोणताही संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ १०० किंवा ११२ या इमर्जन्सी क्रमांकावर संपर्क साधावा. प्रवासी सेवा कंपन्यांनाही चालकांची पार्श्वभूमी तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्तांकडूनही या प्रकरणाची दखल घेतली जात असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *