पुणे -प्रतिनिधी
प्रवास हा तणावभाजीने भरलेल्या आयुष्यातील उत्तम ब्रेक आहे. नवीन ठिकाणी जाण्याने मन ताजे होते, मानसिक आरोग्य सुधारते आणि शारीरिक फिटनेस वाढते. पण आरोग्य धोक्यात न पडता मजा घेण्यासाठी काही मूलभूत काळजी घेणे गरजेचे आहे.डॉक्टर (doctor )तपासणी कराप्रवासापूर्वी डॉक्टरांना भेटा आणि संपूर्ण आरोग्य तपासणी करा. क्रॉनिक आजार असल्यास औषधांचे डोस समायोजित करा, विशेषतः टाइमझोन बदलताना. (Health tips) परदेशी प्रवास असेल तर आवश्यक लसी घ्या.प्रवास विमा (travel vima)घ्याहवाई, ट्रेन किंवा रस्ता प्रवास असो, नेहमी ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या. यामुळे सामान चोरी, दुर्घटना किंवा वैद्यकीय गरज भागते आणि आर्थिक ताण टाळता येतो.
हलके पॅक कराअतिरिक्त ओझे न वाहता फक्त आवश्यक वस्तू घ्या – कपडे, औषधे, चार्जर आणि आरोग्य किट. जास्त सामानामुळे थकवा येतो आणि प्रवासाची मजा उडते.वारंवार ब्रेक घ्यालांब रस्ता प्रवासात प्रत्येक २ तासांनी थांबा, पाय हलवा (Health tips)आणि स्ट्रेचिंग करा. बसून राहिल्याने डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) होण्याचा धोका वाढतो, विशेषतः वृद्धांसाठी.पाणी (Water ) आणि आहार सांभाळाडिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या, जंक फूडऐवजी फळे-सॅलड घ्या. जेटलॅगसाठी झोपेचे वेळापत्रक आधीच तयार करा आणि मास्क-सॅनिटायझर सोबत ठेवा.
