Pune : गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी ! त्या योजनेतून मिळणार ,११,००० रुपयांपर्यंतची मदत

पुणे -प्रतिनिधी

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ने १ जानेवारी २०२६ रोजी ९ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. आतापर्यंत ४ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून माता-बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात ती वरदान ठरत आहे.योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात, ज्यात गर्भधारणानंतर पहिला हप्ता ३,००० रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर दुसरा हप्ता २,००० रुपये समाविष्ट आहेत. (Pune News)

दुसऱ्या अपत्याची मुलगी असल्यास विशेष प्रोत्साहन म्हणून ६,००० रुपये मिळतात, ज्यामुळे समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जातो.महिलेचे वय किमान १९ वर्षे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आणि ई-श्रम कार्ड, बीपीएल कार्ड किंवा पीएम किसान लाभधारक असणे आवश्यक आहे. दिव्यांग महिलांना प्राधान्य आहे.(News)

बाळाच्या जन्मानंतर २७० दिवसांत pmmvy.wcd.gov.in वर किंवा अंगणवाडी केंद्रात आधार कार्ड, बँक पासबुक आणि एमसीपी कार्डासह अर्ज करता येतो.’मिशन शक्ती’च्या ‘सामर्थ्य’ घटकांतर्गत गेल्या ९ वर्षांत १० कोटी महिलांना लाभ मिळाला असून सरकारने १९,०२८ कोटी रुपयांहून अधिक निधी वाटप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *