Sharad Mohol : शरद मोहोळ खूनप्रकरणात सरकारचा दावा: आरोपींची भूमिका गौण असल्याचा युक्तिवाद दिशाभूल करणारा; चार आरोपींचा जामिन अर्ज

पुणे -प्रतिनिधी

 

कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol )हत्येचा गुन्हा पूर्वनियोजित आणि संघटित पद्धतीने रचण्यात आला असून, आरोपींनी थंड डोक्याने कट रचला होता, असे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींची भूमिका गौण असल्याचा बचाव पक्षाचा दावा दिशाभूल करणारा असल्याचा तीव्र युक्तिवाद राज्य सरकारने न्यायालयात केला.मोहोळ खून (Sharad Mohol Murder ) प्रकरणात नितीन खैरे, आदित्य गोळे, अभिजित मानकर आणि ॲड. संजय उडान या चार आरोपींच्या जामीन अर्जांवर विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. राज्याच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत (Adv . Pradeepsinh Rajput) यांनी हा गुन्हा अत्यंत गंभीर असून, त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे सांगत तीव्र विरोध दर्शवला.

 

तपास कागदपत्रांवरून आरोपींचा सक्रिय सहभाग दिसतो, त्यांना जामीन (Bail ) मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव, पुरावे नष्ट करणे किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मोहोळ यांचा ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरूडमधील सुतरदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या घालून खून करण्यात आला होता, जो वर्चस्व वादातून गणेश मारणे टोळीने आखला होता. या प्रकरणात १५ आरोपींसह मारणेवर मकोका लावण्यात आला आहे. मुख्य तक्रारदारांच्या वतीने ॲड. खेताराम सोलंकी, संकेत राव, सोहम यादव आणि तेजस सावंत यांनीही जामीन अर्जांना विरोध करत,

 

अशा गुन्ह्यात जामीन (Bail)देणे समाजात चुकीचा संदेश देईल, असा युक्तिवाद केला. जामीन अर्जांवर पुढील सुनावणी ७ मार्चला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *