पुणे – प्रतिनिधी
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील (Hadpsar Lohiya Garden ) मजूर वसाहतीला शनिवारी पहाटे अडीच वाजता भीषण आग (Fire ) लागली. ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावण्यात आलेली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.(Hadpsar News )
वादविवादानंतर संतापलेल्या २० वर्षीय समर्थ तुपेने त्याची दुचाकी पेटवली, ज्यामुळे शेजारील दोन दुचाकी आणि एकूण १९ झोपड्या जळून खाक झाल्या.अग्निशमन दलाच्या पाच बंबांवर दोन तासांत आग आटोक्यात आली, तरी मजूर कुटुंबीय वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. हडपसर पोलिसांनी आरोपी समर्थ तुपे याला अटक केली असून, भारतीय न्यायसंहिता कलम ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे (DCP Rajkumar Shinde) यांनी सांगितले, की आरोपीने चौकशीत वादातून दुचाकी पेटविल्याची कबुली दिली आहे.बांबू-पत्र्याच्या झोपड्यांमधील गृहोपयोगी वस्तूंमुळे आगने घाटी घेतली. पोलिसांनी पंचनामा करून रहिवाशांची चौकशी केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसाहतीतील मजूर कुटुंबांना नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. (Crime News)
