Hadpsar Murder : वानवडीत कबुतर चोरी संशयाने तरुणाची क्रूर हत्या; चार सख्ख्या भावांना खंडणी विरोधी पथकाच्या बेड्या

पुणे, प्रतिनिधी

हडपसरातील (Hadapsar Murder)शंकरमठ-वैदवाडी परिसरात कबुतर चोरीच्या (Pigeon Theft ) संशयावरून १९ वर्षीय रुपेश धनराज शिंदे याची चार सख्ख्या भावांनी लाठा, बॅट आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण करून हत्या केली.

बुधवारी (१८ मार्च) पहाटे घडलेल्या या भीषण घटनेत गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गौरव (२२), सचिन (२३), मोनू (२६) आणि बंटी (१८) विजयकुमार माजी या शंकरमठ पावर सोसायटीतील चौघांना अटक केली आहे. वानवडी पोलिस ठाण्यात मृतकाचे वडील धनराज बळीराम शिंदे (४५) यांच्या फिर्यादीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.(Pune Crime)

रुपेश शिंदे आणि मित्र अजय टिंगरे हे दुचाकीवरून मोशीकडे जात असताना हडपसर शंकरमठ परिसरात लघुशंकेसाठी थांबले. कबुतरांच्या पेट्यांजवळ गेल्यावर कुत्र्यांचे भुंकणे ऐकून स्थानिकांना संशय आला आणि ‘चोर-चोर’ ची आरोळी देत पाठलाग सुरू झाला. भीतीपोटी पळताना रुपेश मुख्य रस्त्यावर घसरून पडला, तेव्हा आरोपींनी त्याला पकडले. क्रिकेट बॅट, (Brutal Beating)लाकडी लाठा आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण सुरू केली.

रात्रभर कबुतर ढाबळीला बांधून ठेवल्यानंतर सकाळी उलटी आणि बेशुद्धीमुळे प्रकृती खालावली. अपघाताचा बनावट रचून आरोपींनीच त्याला रुग्णालयात नेले, मात्र ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना माहितीदाराने सूचना दिली. रुग्णालयाच्या चाळीस क्रमांकाच्या वॉर्डात चौकशी करताना दोन संशयित मिळाले. (Wanwadi Police)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *