Holi 2026 : येत्या होळी ला गावी निघताय ? पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीचे नियोजन बदलले ..वाचा विशेष तयारी

पुणे -प्रतिनिधी

होळी सण अवघ्या काही दिवसांवर आलाय, त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. उत्तर भारत, मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार, झारखंडी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. (Holi)

पार्सल विभागाजवळ स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारून होळी विशेष गाड्यांचे प्रवासी तिथे थांबतील आणि गाडी येण्यापूर्वीच नियोजित पद्धतीने प्लॅटफॉर्मवर सोडले जातील.या होल्डिंग एरियात बसण्याची सोय, पाणी, मोबाईल चार्जिंग पॉईंट, स्वच्छतागृहे, पंखे आणि शेडची व्यवस्था करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक फलकांवर गाड्यांची माहिती मिळेल. (Pune)

अतिरिक्त तिकीट काऊंटर, एटीव्हीएम (EVM) सुरू करून आरपीफ जवान आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून मदत केंद्र व नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. हे नियोजन दसरा, दिवाळी, छठपूजेसाठीही राबवले जाईल, प्रवाशांनी वेळेआधी पोहोचून घोषणांकडे कान ठेवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *